परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो.
Cross references
“इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैसी कोणी रक्त खाईल! तर मी देव त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
पृथ्वीवरील लोकांना त्याची आठवण राहाणार नाही. आता त्याची आठवण कुणालाही येणार नाही.
जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव मान देतो.
त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. स्वर्गाचा पाया हादरला. का? कारण परमेश्वर क्रोधित झाला होता.
परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.
देवानेच आपले कान केलेत तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो. देवानेच आपले डोळे केलेत. तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.
चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात.
परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे. पण तो चांगल्या माणसांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
दुष्ट माणसांची भव्य आणि सुंदर प्रेतयात्रा मी पाहिली. प्रेतयात्रेहून परत जाताना लोक मेलेल्या दुष्टांबद्दल चांगले बोलत होते. ज्या शहरात दुष्टांनी खूप वाईट गोष्टी केल्या त्याच शहरात हे घडेले. हे फारच अविचारी आहे.
परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो परमेश्वराला अनुसरणे सोडेल, त्याला लाजवले जाईल आणि त्याचे आयुष्य अल्प असेल.
म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकटे आणण्याचे ठरविले आहे. मी यहूदाच्या कुळाचा संपूर्ण नाश करीन.
एखादा इस्राएली वा इस्राएलमध्ये राहणारा परका हिताच्या गोष्टीसाठी संदेष्ट्याकडे जाऊन माझा सल्ला काय आहे ते विचारू लागला, तर मी त्याला सल्ला देईन. त्याच्याजवळ जरी त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पाप करायला लावणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बाळगल्या आणि तो त्यांची अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. आणि माझे उत्तर असे असेल.
जर ते पकडले गेले. आणि त्यांचे शत्रू त्यांना घेऊन गेले. तर मी तलवारीला आज्ञा करीन. आणि ती त्यांना तेथे ठार मारील. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन हे खरे, पण त्यांना त्रास कसा होईल हे मी पाहीन. त्यांचे भले कसे होईल, हे मी पाहणार नाही.”