म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकटे आणण्याचे ठरविले आहे. मी यहूदाच्या कुळाचा संपूर्ण नाश करीन.
Cross references
“इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैसी कोणी रक्त खाईल! तर मी देव त्या माणसापासून आपले तोंड फिरवीन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
तर मी त्या माणसाच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध होईन! आणि त्याला व मजवर अविश्वास दाखवून जे कोणी मोलख दैवताच्या नादी लागून त्याच्या मागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!
मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो.
यरुशलेम नगरीवर संकट आणण्याचे मी ठरविले आहे. मी तिला मदत करणार नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “मी बाबेलच्या राजाला यरुशलेम देऊन टाकीन. तो ती आगीत भस्मसात करील.’
पण मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांनो परमेश्वराचा संदेश ऐका मी माझ्या महान नावाची शपथ घेऊन वचन देतो की मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी लोकांपैकी कोणीही पुन्हा कधीही वचन देताना, माझी शपथ घेणार नाहीत ते पुन्हा कधीही “देवा शपथ.” असे म्हणणार नाही.
एखादा इस्राएली वा इस्राएलमध्ये राहणारा परका हिताच्या गोष्टीसाठी संदेष्ट्याकडे जाऊन माझा सल्ला काय आहे ते विचारू लागला, तर मी त्याला सल्ला देईन. त्याच्याजवळ जरी त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पाप करायला लावणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बाळगल्या आणि तो त्यांची अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. आणि माझे उत्तर असे असेल.
“मी त्या लोकांना शिक्षा करीन. पण काही लोक त्या अर्धवट जळालेल्या काटक्यांप्रमाणे असतील. त्यांना शिक्षा होईल. पण त्यांचा संपूर्ण नाश होणार नाही. ‘मीच त्यांना शिक्षा केली’ हे तुम्हाला दिसून येईल व मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.
जर ते पकडले गेले. आणि त्यांचे शत्रू त्यांना घेऊन गेले. तर मी तलवारीला आज्ञा करीन. आणि ती त्यांना तेथे ठार मारील. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन हे खरे, पण त्यांना त्रास कसा होईल हे मी पाहीन. त्यांचे भले कसे होईल, हे मी पाहणार नाही.”