परमेश्वर वरुन खाली आला आणि त्याने माझे रक्षण केले. परमेश्वराने मला धरले आणि खोल पाण्यातून (संकटांतून) बाहेर काढले.
Cross references
ते मूल वाढले. मग काही काळानंतर एके दिवशी ती बाई त्या बाळाला घेऊन राजकन्येकडे आली; तेव्हा राजकन्येने ते बाळ घेतले आणि त्याला आपला स्वत:चा मुलगा म्हणून स्वीकारले; तिने त्याचे नांव मोशे ठेवले कारण तिने त्याला पाण्यातून उचलून घेतले होते.
मला परमेश्वराने आधार दिला वरुन तो खाली आला. मला धरून त्याने संकटांच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
माझ्याशी लढणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला त्या राष्ट्रांचा प्रमुख कर जे लोक मला माहीत देखील नाहीत ते लोक माझी सेवा करतील.
याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले.
तो स्वर्गातून मला मदत करतो आणि मला वाचवतो. मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो. देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.
परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोहोच आणि मला वाचव. मला या शत्रूंच्या समुद्रात बुडू देऊ नकोस. मला त्या परक्यांपासून वाचव.
“समुद्राच्या पाण्याने मला वेढले पाण्याने माझे तोंड बुडाले आणि मी श्वासोच्छवास करु शकत नव्हतो मी खाली खूप खोल समुद्रात गेलो माझ्या डोक्याभोवती समुद्रशेवाळ गुंडाळले गेले.
परमेश्वर समुद्राला कठोरपणे बोलेल आणि समुद्र आटेल तो सर्व नद्या कोरड्या पाडेल बाशान व कर्मेल येथील समृध्द प्रदेश सुकून नष्ट होईल लबानोनमधील फुले कोमेजतील.
मग देवदूत मला म्हणाला, “जे पाण्यांचे प्रवाह तू पाहिले, ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक,समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहेत.