माझा आत्मा आईच्या कुशीत समाधान पावलेल्या बाळासारख अविचल आणि शांत आहे.4इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याच्यावर आता आणि सदैव विश्वास ठेवत राहा.
Cross references
इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते. परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे.
परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. का? कारण परमेश्वर विश्वासास प्रात्र आहे, ह्याची देव त्याला प्रचिती देईल.