Home Bibles स्तोत्रसंहिता 119:95 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:95 · मराठी बायबल

दुष्टांनी माझा नाश करायचा प्रयत्न केला. पण तुझ्या कराराने मला शहाणे बनवले.

Cross references

1 शमुवेल 23:20

हे राजा तू आता केव्हाही तिकडे ये, दावीदला तुझ्या हवाली करणे हे आमचे कर्तव्यच आहे.”

2 शमुवेल 17:1

शिवाय अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, “मला आता बाराहजार माणसांची निवड करु दे म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो.

स्तोत्रसंहिता 10:8

ते गुप्त जागी लपून बसतात आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात. ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.

स्तोत्रसंहिता 27:2

माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील. माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.

स्तोत्रसंहिता 37:32

परंतु दुष्ट लोक चांगल्यांना दु:खी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात ते चांगल्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.

स्तोत्रसंहिता 38:12

माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत. ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.

स्तोत्रसंहिता 119:24

तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे. तो मला चांगला उपदेश करतो.

स्तोत्रसंहिता 119:31

मी तुझ्या कराराशी चिकटून राहातो. परमेश्वरा, माझी निराशा करु नकोस.

स्तोत्रसंहिता 119:61

वाईट लोकांनी माझ्याविषयी काही अनुदार उद्गार काढले. पण परमेश्वरा, मी तुझी शिकवण विसरलो नाही.

स्तोत्रसंहिता 119:69

तला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याबद्दल खोट सांगितलं पण परमेश्वरा, मी तरी ही अगदी मनापासून तुझ्या आज्ञा पाळणे चालूच ठेवले.

स्तोत्रसंहिता 119:85

काही गार्विष्ठ लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुपसला आणि ते तुझ्या शिकवणी विरुध्द आहे.

स्तोत्रसंहिता 119:111

परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो.

स्तोत्रसंहिता 119:125

मी तुझा सेवक आहे, मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.

स्तोत्रसंहिता 119:129

परमेश्वरा, तुझा करार अद्भुत आहे म्हणूनच मी तो पाळतो.

स्तोत्रसंहिता 119:167

मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा, मला तुझे नियम खूप आवडतात.

मत्तय 26:3

मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील, प्रमुख याजकाच्या घरी जमले. प्रमुख याजकाचे नाव कयफा होते.

प्रेषितांचीं कृत्यें 12:11

पेत्राला मग कळले की नेमके काय घडले. आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने त्याचा दूत माइयाकडे पाठविला. व त्याने मला हेरोदापासून सोडविले. यहूदी लोकांना वाटले की, माझा छळ होईल. पण प्रभूने मला या सर्वांतून सोडविले आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:21

पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका! कारण चाळीस लोकांडून अधिक लोक लपून बसणार आहेत व पौलाला गाठून मारणार आहेत. त्यांनी अशा प्रकारची शपथ वाहिली आहे की, जोपर्यंत ते पौलाला मारणार नाहीत तोपर्यंत कोणीही काहीही खाणार वा पिणार नाही, म्हणून ते आता तुमच्या होकाराची वाट पाहत अगदी तयारीत आहेत.”

प्रेषितांचीं कृत्यें 25:3

आणि पौलाला यरुशलेमला पाठवून द्यावे, अशी त्याला विनंति केली. पौलाला वाटेत ठार मारण्याचा ते कट करीत होते.

Interlinear

Choose Theme