Home Bibles स्तोत्रसंहिता 119:125 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:125 · मराठी बायबल

मी तुझा सेवक आहे, मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.

Cross references

2 इतिहास 1:7

त्यारात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले. तो म्हणाला, “शलमोन, मी तुला काय द्यावे अशी तुझी इच्छा आहे ते मला माग.”

स्तोत्रसंहिता 86:16

देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव. तू माझ्यावर दया कर. मी तुझा दास आहे. मला शक्ती दे. मी तुझा सेवक आहे मला वाचव.

स्तोत्रसंहिता 116:16

मी तुझा सेवक आहे. मी तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे. परमेश्वरा, तू माझा पहिला गुरु आहेस.

स्तोत्रसंहिता 119:11

मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का? म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.

स्तोत्रसंहिता 119:18

परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.

स्तोत्रसंहिता 119:29

परमेश्वरा, मला खोटं जगू देऊ नकोस. मला तुझ्या शिकवणीने मार्गदर्शन कर.

स्तोत्रसंहिता 119:34

मला तुझी शिकवण समजून घ्यायला मदत कर आणि मी ती पूर्णपणे पाळीन.

स्तोत्रसंहिता 119:66

परमेश्वरा, योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान मला दे. माझा तुझ्या आज्ञांवर विश्वास आहे.

स्तोत्रसंहिता 119:94

परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर. का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.

नीतिसूत्रे 9:10

परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवणाची पहिली पायरी आहे.

नीतिसूत्रे 14:8

हुशार लोक शहाणे असतात. कारण ते ज्या गोष्टी करतात त्याचा काळजीपूर्वक विचार करतात. पण मूर्ख लोक मूर्ख असतात कराण आपण दुसऱ्यांना फसवून जगू शकतो असे त्यांना वाटत असते.

रोमकरांस 6:22

परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.

2 करिंथकरांस 3:5

असे नाही की आम्ही स्वत:हून आमच्यासाठी सर्वकाही करण्यास समर्य आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते.

2 तीमथ्थाला 2:7

मी काय म्हणतो याविषयी तू विचार करावा अशी माझी इच्छा आहे. प्रभु तुला या सर्व गोष्टी समजून घेण्याचे सामर्थ्य देईल.

याकोब 1:5

म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल.

याकोब 3:13

तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे.

Interlinear

Choose Theme