Home Bibles स्तोत्रसंहिता 106:45 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 106:45 · मराठी बायबल

देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.

Cross references

निर्गम 32:14

तेव्हा परमेश्वराला लोकांबद्दल वाईट वाटले आणि आधी म्हटल्याप्रमाणे त्याने त्यांचा नाश केला नाही.

लेवीय 26:40

“परंतु कदाचित् ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील.

लेवीय 26:45

त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!”

अनुवाद 32:36

“परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करुन सोडील.

शास्ते 2:18

अनेकदा शत्रु इस्राएलांचा जाच करत. अशावेळी ते मदतीलाठी परमेश्वराचा धावा करीत आणि तेव्हा त्यांची दया येऊन परमेश्वर त्यांच्या सुटकेसाठी न्यायाधीशाला पाठवी. परमेश्वर या न्यायाधीशांच्या बरोबर होता. म्हणून इस्राएल लोकांचे दरवेळी शत्रूपासून रक्षण झाले.

शास्ते 10:16

मग इस्राएल लोकांनी त्या परक्या दैवतांचा त्याग केला. परमेश्वराकडे ते पुन्हा एकदा वळले. त्यांचे हाल पाहून परमेश्वराला त्यांची दया आली.

2 शमुवेल 24:16

यरुशलेमच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वराला फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.

2 राजे 13:23

पण परमेश्वरालाच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वराला इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्याला त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.

स्तोत्रसंहिता 51:1

देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.

स्तोत्रसंहिता 69:16

परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.

स्तोत्रसंहिता 90:13

परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.

स्तोत्रसंहिता 105:8

परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा. हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.

स्तोत्रसंहिता 135:14

परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.

स्तोत्रसंहिता 136:23

आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

यशया 63:7

परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन. परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन. इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे. परमेश्वराने आमच्यावर दया केली.

यिर्मया 18:8

पण त्या राष्ट्रातील लोकांचे हृदयपरिवर्तन झाल्यास ते जगतील. त्या राष्ट्रातील लोक दुष्कृत्ये करण्याचे कदाचित थांबवतील. मग माझे मतपरिवर्तन होईल. त्या राष्ट्राचा नाश करण्याचा बेत मी अंमलात आणणार नाही.

विलापगीत 3:32

परमेश्वर जेव्हा शिक्षा करतो, तेव्हा तो दया पण दाखवितो. हा त्याचा दयाळूपणा त्याच्या जवळील महान प्रेम व थोर करुणा ह्यामुळे आहे.

यहेज्केल 16:60

पण आपण केलेल्या कराराची मला आठवण असेल. मी तुझ्याबरोबर करार केला होता. आणि तो कायम चालू राहणार आहे.

होशेय 11:8

“एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही. इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते. अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही. माझे मन:परिवर्तन होत आहे. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.

आमोस 7:3

मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन:परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”

आमोस 7:6

मग परमेश्वराचे ह्या गोष्टीबाबत ह्रदयपरिवर्तन झाले. परमेश्वर प्रभू म्हणाला, “हीही घटना घडणार नाही.”

लूक 1:71

जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.

Interlinear

Choose Theme