परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
Cross references
“परमेश्वर आपल्या प्रजेची कसोटी पाहील. आपल्या सेवकांवर दया दाखवील. पण गुलाम तसेच स्वतंत्र यांना तो सत्ताहीन, असहाय्य करुन सोडील.
मग इस्राएल लोकांनी त्या परक्या दैवतांचा त्याग केला. परमेश्वराकडे ते पुन्हा एकदा वळले. त्यांचे हाल पाहून परमेश्वराला त्यांची दया आली.
यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेवराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले त्या वेळी” परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होत.
परमेश्वरा, माझा निवाडा कर. मी बरोबर आहे हे सिध्द कर मी निरपराध आहे हे सिध्द कर.
आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा. परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.
“एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही. इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते. अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही. माझे मन:परिवर्तन होत आहे. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.
मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन:परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
मग परमेश्वराचे ह्या गोष्टीबाबत ह्रदयपरिवर्तन झाले. परमेश्वर प्रभू म्हणाला, “हीही घटना घडणार नाही.”
योनाने परमेश्वराकडे तक्रार केली. तो म्हणाला, “हे असे होणार हे मला माहीतच होते! मी माझ्या देशात होतो. तू मला येथे येण्यास सांगितलेस. त्याच वेळी मला कळले की या पापी नगरीच्या लोकांना तू क्षमा करणार. म्हणून मी तार्शिशला पळून जायचे ठरविले. तू दयाळू परमेशवर आहेस. हे मला ठाऊक होते. तू दया दाखवितोस आणि लोकांना शिक्षा करण्याची तुझी इच्छा नसते हे मला माहीतच होते. तू दयेचा सागर आहेस, हे मी जाणून होतो. मला माहीत होते की हे लोक पापांपासून परावृत्त झाल्यास, त्यांचा नाश करण्याचा बेत तू बदलशील.