Home Bibles स्तोत्रसंहिता 105:29 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 105:29 · मराठी बायबल

म्हणून देवाने पाण्याचे रक्तात रुपांतर केले आणि सगळे मासे मेले.

Cross references

निर्गम 7:20

तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उगारली नाईल नेदीवर मारली. त्याने हे फारो व त्याचे अधिकारी यांच्यासमोर केले. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले.

निर्गम 7:21

नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकेनात. अवघ्या मिसरभर रक्तच रक्त झाले.

स्तोत्रसंहिता 78:44

देवाने नद्यांचे रक्तात रुपांतर केले. मिसरमधले लोक पाणी पिऊ शकले नाहीत.

यशया 50:2

मी घरी आलो तर घरी कोणीच नव्हते. मी खूप हाका मारल्या पण कोणीच उत्तर दिले नाही. मी तुमचे रक्षण करू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का? तुमच्या सर्व संकटातून वाचविण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी आहे. बघा! जर मी समुद्राला वाळून जाण्याची आज्ञा दिली, तर तो वाळून जाईल. मग पाणी नसल्याने मासे मरतील आणि त्यांना दुर्गंधी सुटेल.

यहेज्केल 29:4

“पण मी तुझ्या जबड्यात गळ अडकवीन. नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. मी तुला आणि त्या माशांना नदीतून ओढून बाहेर काढीन व जमिनीवर टाकीन. तेथून तुम्हाला कोणी उचलणार नाही वा पुरणार नाही. मी तुम्हाला पक्षी व हिंस्र पशू यांच्या स्वाधीन करीन. तुम्ही त्यांचे भक्ष्य व्हाल.

प्रकटीकरण 16:3

दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातीलप्रत्येक जीवधारी प्राणी मेले,

Interlinear

Choose Theme