Home Bibles स्तोत्रसंहिता 105:22 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 105:22 · मराठी बायबल

योसेफने इतर प्रमुखांना सूचना दिल्या. योसेफने वृध्दांना शिकवले.

Cross references

उत्पत्ति 41:33

तेव्हा, फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करुन त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे;

उत्पत्ति 41:38

फारोने म्हटले, “योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य, दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते!”

उत्पत्ति 41:44

फारो योसेफाला म्हणाला, “मी मिसराचा राजा आहे खरा, परंतु तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाहीं.”

यशया 19:11

“सोअनचे नेते मूर्ख आहेत. फारोचे ‘शहाणे सल्लागार’ चुकीचा सल्ला देतात. हे नेते स्वत:ला शहाणे समजतात. ते म्हणतात की आम्ही पूर्वीच्या राजघराण्यातील आहोत. पण ते स्वत:ला जेवढे शहाणे समजतात तेवढे ते नाहीत.”

Interlinear

Choose Theme