Home Bibles स्तोत्रसंहिता 102:24 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 102:24 · मराठी बायबल

म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस. देवा, तू कायमचाच जगणार आहेस!

Cross references

ईयोब 36:26

होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आणि देवाचे अस्तित्व कधीपासून आहे तेही आपल्याला माहीत नाही.

स्तोत्रसंहिता 9:7

परंतु परमेश्वर अनंत काळ राज्य करतो. त्याने त्याचे राज्य सामर्थ्यवान बनवले आहे, हे त्याने जगात न्यायव्यवस्था यावी म्हणून केले.

स्तोत्रसंहिता 39:13

परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस. मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे. मी थोड्याच वेळात जाणार आहे.

स्तोत्रसंहिता 89:46

परमेश्वरा, हे किती काळ चालणार आहे? तू आमच्याकडे सदैव दुर्लक्ष करणार आहेस का? तुझा राग अग्रीसारखा सदैव धुमसत राहाणार आहे का?

स्तोत्रसंहिता 90:1

प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.

स्तोत्रसंहिता 102:12

पण परमेश्वरा, तू सदैव असशील तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.

यशया 38:10

मी म्हातारा होईपर्यंत जगावे असे मीच स्वत:शी म्हटले होते. पण अधोलोकाच्या दारातून जाण्याची माझी वेळ आली, आता मला सर्व काळ तेथेच काढावा लागेल असे मला वाटते.

हबक्कूक 1:12

त्यानंतर हबक्कूक म्हणाला, “परमेश्वरा, तू सनातन परमेश्वर आहेस तू माझा कधीही न मरणारा पवित्र, देव आहेस परमेश्वरा, जे केलेच पाहिजे, ते करण्यासाठीच तू खास्द्यांना निर्मिले आहेस आमच्या खडका, यहूद्यांच्या लोकांना शिक्षा करण्यासाठी तू त्यांना निर्मिले आहेस.

प्रकटीकरण 1:4

योहानाकडून, आशियाप्रांतातील सात मंडळ्यांना:जो आहे, जो होता व जो येणार आहे त्या एकापासून (देवापासून): आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडूनतुम्हांस कृपा व शांति असो.

प्रकटीकरण 1:8

प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगाआहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.”

Interlinear

Choose Theme