Home Bibles नीतिसूत्रे 9:3 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 9:3 · मराठी बायबल

नंतर तिने आपल्या नोकरांकरवी शहरातील लोकांना तिच्याबरोबर टेकडीवर भोजन करण्यासाठी येण्याचे आमंत्रण पाठविले. ती म्हणाली,

Cross references

स्तोत्रसंहिता 68:11

देवाने आज्ञा केली आणि बरेच लोक चांगली बातमी सांगण्यासाठी गेले.

नीतिसूत्रे 1:20

ऐक! ज्ञान (रुपी स्त्री) लोकांना शिकवायचा प्रयत्न करीत आहे. ती रस्त्यात आणि बाजारात ओरडत आहे.

नीतिसूत्रे 8:1

ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला तू एकावेस म्हणून तुला बोलावत आहेत.

नीतिसूत्रे 9:14

ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते. ती शहारातल्या टेकडीवर तिच्या खुर्चीवर बसते.

नीतिसूत्रे 9:16

“या ज्या लोकांना शिकणे आवश्यक आहे त्यांनी या.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले.

मत्तय 22:3

त्याने त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते आशाना बोलाविण्यास सांगिले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.

मत्तय 22:9

म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.

लूक 11:49

यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्ट त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’

लूक 14:17

भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना “या, कारण सर्व तयार आहे’ हे सांगण्यासाठी नोकराला पाठविले.

लूक 14:21

म्हणून जेव्हा तो नोकर परत आला, तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, “लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगारातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’

योहान 7:37

सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठयाने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.

योहान 18:20

येशूने त्याला उत्तर दिले की, “मी उघडपणे जगाशी बोललो, सभास्थानात व मंदिरात जेथे सर्व यहूदी एकत्र जमतात तेथे मी नेहमी शिकविले आणि मी गुप्त असे काहीच बोललो नाही.

रोमकरांस 10:15

त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!

2 करिंथकरांस 5:20

म्हणून आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काय देव आमच्या द्वारे त्याचे आवाहन करीत होता. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हांला विनंति करतो. देवाशी समेट करा.

Interlinear

Choose Theme