Home Bibles नीतिसूत्रे 6:9 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 6:9 · मराठी बायबल

आळशी माणसा, तू किती वेळ झोपून राहाणार आहेस? तू विश्रांतीतून केव्हा उठणार आहेस?

Cross references

स्तोत्रसंहिता 94:8

तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात. तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार? तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात! तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

नीतिसूत्रे 1:22

“तुम्ही लोक मूर्ख आहात. तुम्ही आणखी किती काळ मूर्ख गोष्टी करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाची थट्टा किती काळ करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाचा किती काळ तिरस्कार करणार आहात?

नीतिसूत्रे 19:15

आळशी माणसाला भरपूर झोप मिळेल पण तो खूप उपाशीही असेल.

नीतिसूत्रे 24:33

“थोडीशी झोप, थोडी विश्रांती, हाताची घडी आणि वामकुक्षी.”

नीतिसूत्रे 26:14

आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही.

उपदेशक 4:5

काही लोक म्हणतात, “हाताची घडी घालून स्वस्थ बसणे हा मूर्खपणा आहे. तुम्ही जर काम केले नाही तर उपाशीपोटी मराल.”

यिर्मया 4:14

यरुशलेममधील लोकांनो, तुमच्या मनातील पाप धुवून टाका. तुमची मने शुद्ध करा. मग तुम्ही वाचविले जाऊ शकता. दुष्ट बेत करीत बसू नका.

योहान 1:6

योहाननावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठवीले.

रोमकरांस 13:11

आणि तुम्ही हे करा कारण तुम्हांस ठाऊक आहे की, आपण ज्या काळात राहतो त्यातून तुम्ही उठावे अशी वेळ आली आहे, कारण जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यापेक्षाही आमचे तारण अधिक जवळ आले आहे.

इफिसकरांस 5:14

आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते, ती प्रकाश आहे. म्हणूनच आम्ही असे म्हणतो: “हे झोपलेल्या जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल”.

1 थेस्सलनीकाकरांस 5:2

कारण तुम्ही स्वत:चे हे चांगल्या प्रकारे जाणता की, प्रभूच्या परत येण्याचा दिवस येईल. तो जणू काय रात्रीचा चोर जसा येतो तसा येईल.

Interlinear

Choose Theme