पण वाईट लोक रात्रीसारखे असतात. ते काळोखात हरवून जातात आणि दिसू न शकणाऱ्या वस्तूंना अडखळून पडतात.
Cross references
सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
ते धूर्त, भर दिवसासुध्दा अडखळतात. भर दुपारच्या वेळेला ते आंधळ्यासारखे त्यांचा रस्ता चाचपडत जातात.
हे नेते अंधारात वाट शोधणाऱ्या माणसाप्रमाणे असतात. दारु प्यायलेल्या माणसाला जसे आपण कुठे जात आहोत ते कळत नाही, तसे ते असतात.”
“हो दुष्ट माणसाचा प्रकाश नाहीसा होईल. त्याचा अग्री पेटणे बंद होईल.
लोक त्याला प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील. लोक त्याचा पाठलाग करुन या जगातून पळवून लावतील.
“काय घडते आहे ते त्यांनाकळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
त्यांनी चांगुलपणा सोडला आणि आता ते पापाच्या अंधकारात राहात आहेत.
वाईट लोक अनेक संकटांच्या जाळ्यात अडकले आहेत. पण जो माणूस आपल्या आत्म्याची काळजी करतो तो संकटांपासून दूर राहातो.
सगळा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा गेला आहे. आमच्याभोवती फक्त अंधार आहे. म्हणून आम्ही उजेडासाठी थांबले पाहिजे. आम्ही तेजस्वी प्रकाशाची आशा करतो. पण आम्हाला फक्त अंधारच मिळाला आहे.
आम्ही डोळे नसलेल्याप्रमाणे आहोत. आंधळ्यांप्रमाणे आम्ही भिंतीपाशी धडपडतो. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही पडतो. दिवसासुध्दा आम्ही पाहू शकत नाही. दुपारी आम्ही मेलेल्या माणसांप्रमाणे पडतो.
परमेश्वराचा, तुमच्या देवाचा मान राखा. त्याचे स्तवन करा, नाहीतर तो अंधकार पसरवील. अंधकारमय टेकड्यांवर पडण्याआधीच त्याचे स्तुतिस्तोत्र गा. तुम्ही यहूदाचे लोक प्रकाशाची वाट पाहता, पण परमेश्वर प्रकाशाचे गाढ अंधकारात रुपांतर करेल. तो प्रकाशाला दाट अंधारात बदलेल.
“मी माझा संदेश त्यांच्याकडे पाठविण्याचे बंद करीन. मग त्यांची स्थिती अंधारात चालणाऱ्यांसारखी होईल. मी असे केल्यास संदेष्टे व याजक ह्यांच्यासाठी वाट जणू निसरडी होईल. ते त्या अंधारात पडतील मी त्यांच्यावर अरीष्ट आणीन. मी त्यांना शिक्षा करीन.” हा देवाकडून आलेला संदेश आहे.
तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हांला ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”
मग येशू त्यांना म्हणाला. “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला. यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करु नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.
पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळतनाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे.