Home Bibles ईयोब 18:5 · मराठी बायबल
ईयोब 18:5 · मराठी बायबल

“हो दुष्ट माणसाचा प्रकाश नाहीसा होईल. त्याचा अग्री पेटणे बंद होईल.

Cross references

ईयोब 15:30

दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते. तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.

ईयोब 21:17

परंतु देव दुष्ट माणसांचा प्रकाश किती वेळा मालवू शकतो? किती वेळा त्यांच्यावर संकटे कोसळतात? देव त्यांच्यावर रागावून त्यांना शिक्षा करतो का?

नीतिसूत्रे 4:19

पण वाईट लोक रात्रीसारखे असतात. ते काळोखात हरवून जातात आणि दिसू न शकणाऱ्या वस्तूंना अडखळून पडतात.

नीतिसूत्रे 13:9

चांगला माणूस हा दैदीप्यमान दिव्यासारखा असतो. पण दुष्ट माणूस चटकन् विझणाऱ्या दिव्यासारखा असतो.

नीतिसूत्रे 20:20

जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द किंवा वडिलांविरुध्द बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे.

नीतिसूत्रे 21:4

गर्विष्ठ दृष्टी व गर्विष्ठ विचार पापरुप आहेत. माणूस पातकी आहे हेच ते दर्शवितात.

नीतिसूत्रे 24:20

या दुष्ट लोकांना आशा नसते. त्यांचा प्रकाश काळोख होईल.

यशया 50:11

“पाहा! तुम्ही लोक स्वत:च्या इच्छेप्रमाणे राहू इच्छिता. तुम्ही स्वत:चा अग्नी पेटविता आणि मशाली पाजळता. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहा. पण तुम्हाला शिक्षा होईल. स्वत:च पेटविलेल्या आगीत तुम्ही पडाल आणि जळाल. मी हे घडवून आणीन.”

Interlinear

Choose Theme