Home Bibles नीतिसूत्रे 27:11 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 27:11 · मराठी बायबल

मुला शहाणा हो. त्यामुळे मला आनंद वाटेल. नंतर जो कुणी माझ्यावर टीका करेल त्याला मी उत्तर देऊ शकेन.

Cross references

स्तोत्रसंहिता 119:42

त्यावेळी ज्या लोकांनी माझा पाणउतारा केला होता त्यांना द्यायला माझ्याजवळ उत्तर असेल. परमेवरा, तू सांगतोस त्या गोष्टींवर माझा खरोखरच विश्वास आहे.

स्तोत्रसंहिता 127:4

तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत.

नीतिसूत्रे 10:1

ही शलमोनाची नीतिसूत्रे (शहाणपणाच्या गोष्टी) आहेत शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो.

नीतिसूत्रे 15:20

शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख माणूस त्याच्या आईला लाज आणतो.

नीतिसूत्रे 23:15

मुला, तू जर शहाणा झालास तर मी खूप आनंदी होईन.

नीतिसूत्रे 23:24

चांगल्या माणसाचे वडील खूप आनंदी असतात. एखाद्याचे मूल जर शहाणे असेल तर ते खूप आनंद देते.

नीतिसूत्रे 23:25

म्हणून तुमच्या आई - वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. तुमच्या आईला आनंद घेऊ द्या.

नीतिसूत्रे 29:3

जर एखाद्या माणसाला शहाणपण आवडत असेल तर त्याच्या वडिलांना आनंद वाटतो. पण जर एखादा माणूस वेश्येवर पैसा खर्च करत असेल तर तो त्याची संपत्ती गमावून बसेल.

उपदेशक 2:18

मी जे अपार कष्ट केले त्याचा मी किरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्याना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही.

फिलेमोना 1:7

तुझ्या प्रेमामुळे मला मोठा आनंद आणि समाधान मिळाले आहे. कारण बंधु, तुझ्या प्रयत्नांमुळे देवाच्या लोकांची अंत:करणे संजीवित झाली आहेत.

फिलेमोना 1:19

मी, पौल, हे माझ्या स्वत:च्या हातांनी लिहीत आहे: मी याची तुला परतफेड करीन. (मी तुला हे सांगण्याची गरज नाही की, तुझे स्वत:चे जीवन तू मला देणे लागतोस.)

2 योहान 1:4

पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फारआनंद झाला.

Interlinear

Choose Theme