Home Bibles फिलेमोना 1:7 · मराठी बायबल
फिलेमोना 1:7 · मराठी बायबल

तुझ्या प्रेमामुळे मला मोठा आनंद आणि समाधान मिळाले आहे. कारण बंधु, तुझ्या प्रयत्नांमुळे देवाच्या लोकांची अंत:करणे संजीवित झाली आहेत.

Cross references

2 करिंथकरांस 7:4

मला तुमच्याविषयी मोठा विश्वास वाटतो, मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, तुमच्या बाबतीत मी अधिक उत्तेजित झालो आहे. अनेक त्रास झाले तरी आमच्या सर्व त्रासात आमच्या आनंदाला उधाण आले आहे.

2 करिंथकरांस 7:13

यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले.आमच्या स्वत:च्या उत्तेजनाशिवाय आणखी आम्ही विशेषत: तीताला आनंदीत पाहून आम्हांला आनंद झाला कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजातवाना झाला आहे.

1 थेस्सलनीकाकरांस 1:3

आम्ही आमचा देव व पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सोशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो.

1 थेस्सलनीकाकरांस 2:13

आणि, या कारणासाठी आम्हीसुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला, तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश, जो तुम्हा विश्वास णाऱ्यांच्यामध्ये सुद्धा कार्य करीत आहे.

1 थेस्सलनीकाकरांस 2:19

शेवटी, जेव्हा आपला प्रभु येशू दुसऱ्यांदा येईल, तेव्हा त्याच्यासमोर उभे राहू तेव्हा आमची आशा, किंवा आनंद किंवा मुकुट काय असेल, ज्याचा आम्हांला अभिमान वाटेल? ते तुम्हीच नाही का?

1 थेस्सलनीकाकरांस 3:9

तुमच्यामुळे आमच्या देवासमक्ष ज्या सर्व आनंदाचा अनुभव आम्ही घेत आहोत त्याबद्दलचे देवाकडे तुमच्यासाठी आम्ही पुरेसे आभार कसे मानायचे?

2 तीमथ्थाला 1:16

अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.

फिलेमोना 1:20

होय बंधु, प्रभूमध्ये मला तुझ्यापासून काही फायदा हवा आहे. ख्रिस्तामध्ये माझे अंत:करण उल्हासित कर.

2 योहान 1:4

पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फारआनंद झाला.

3 योहान 1:3

जेव्हा काही बंधु आले आणि सत्यात तूसातत्याने कसे चालतोस याविषयी त्यांनी साक्ष दिली आणि तू सत्याविषयीच्या विश्वासूपणाबद्दल मला सांगितले तेव्हा मलाफार आनंद झाला.

Interlinear

Choose Theme