राजासमोर स्वत:ची फुशारकी मारु नका. आपण प्रसिध्द आहोत असे म्हणू नका.
Cross references
परंतु मोशे देवाला म्हणाला, “मी कोणी मोठा माणूस नाही! मी साधा माणूस आहे! तेव्हा फारोकडे जाऊन इस्राएल लोकांना मिसरमधून घेऊन यावयाच्या पात्रतेचा माणूस मी नाही, तर मग मी हे कसे करु शकेन?”
आणि तीन दिवसांपूर्वी हरवलेल्या त्या गाढवांची काळजी करु नकोस. ती सापडली आहेत. आता इस्राएलला तुझी गरज आहे. इस्राएलला तू आणि तुमच्या घराण्यातील सर्व हवे आहात.”
शमुवेल सांगायला लागला, “पूर्वी तू स्वत:ला मोठा समजत नव्हतास. पण तू सर्व इस्राएलांचा प्रमुख बनलास. परमेश्वराने तुला राजा म्हणून नेमले.
पण दावीद म्हणाला, “माझे घराणे तुमच्या तोलामोलाचे नाही. मीही काही मोठा माणूस नव्हे. तेव्ही मी राजकन्येशी कसा विवाह करु?”
“शिवाय दावीदाला हे ही सांग “सर्वशकितमान परमेश्वर असे म्हणतो. तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले आहे. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले.
परमेश्वरा, मी गर्विष्ठ नाही. मी कुणीतरी मोठा आहे असे मी वागत नाही. मी खूप भव्य असे काही करायचा प्रयत्न करत नाही. मी माझ्या आवाक्या बाहेरच्या गोष्टींची चिंता कधीच करत नाही.
विनम्र राहून गरीब लोकांबरोबर राहणे हे जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा चांगले समजतात, त्यांच्याबरोबर राहून श्रीमंतीचे वाटेकरी होण्यापेक्षा चांगले असते.
जर तुम्ही खूप मध खाल्लात तर तो तुमच्यासाठी योग्य नाही. त्याचप्रमाणे स्वत:साठी खूप मानमरातब घेण्याचा प्रयत्न करु नका.
स्वत:चीच स्तुती कधीही करु नका. ती दुसऱ्यांना करु द्या.
मग यिर्मया म्हणाला, “पण सर्वशक्तिमान परमेश्वरा, मला कसे बोलावे ते माहीत नाही. मी तर एक लहान बाआलक आहे.”
अमास्या आमोसला असेही म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात जा आणि तेथे जेव! तेथेच दे तुझे प्रवचन.