Home Bibles 1 शमुवेल 15:17 · मराठी बायबल
1 शमुवेल 15:17 · मराठी बायबल

शमुवेल सांगायला लागला, “पूर्वी तू स्वत:ला मोठा समजत नव्हतास. पण तू सर्व इस्राएलांचा प्रमुख बनलास. परमेश्वराने तुला राजा म्हणून नेमले.

Cross references

शास्ते 6:15

पण गिदोन उत्तरादाखल म्हणाला, “मला क्षमा कर कारण मी इस्राएल लोकांना कसा काय वाचवू शकणार? मनश्शेच्या वंशात सगव्व्यात दुबळे माझे कूळ आहे आणि मी घरातला सर्वात धाकटा”

1 शमुवेल 9:21

शौल म्हणाला, “मी बन्यामीन घराण्यातला आहे. आमचे घराणे इस्राएल मधले सर्वात लहान घराणे आहे आणि बन्यामीन घराण्यात आमचे कुटुंब सगळ्यात छोटे आहे. मग इस्राएलला मी कशासाठी हवा आहे बरे?”

1 शमुवेल 10:1

शमुवेलने मग एका खास तेलाची कुपी घेतली आणि शौलच्या मस्तकावर ती ओतली. शौलचे चुंबन घेऊन तो म्हणाला, “परमेश्वराने त्याच्या प्रजेचा नेता म्हणून तुला आभिषिक्त केले (निवडले) आहे. त्यांचा तू अधिपती होशील. भोवतालच्या शत्रूंपासून त्यांचे रक्षण करशील. त्यासाठीच परमेश्वराने तुझा अभिषेक केला आहे हे खरे आहे. याची साक्ष पटवणाऱ्या या खुणा ऐक

1 शमुवेल 10:22

त्यांनी परमेश्वराला विचारले, “शौल इथे आला आहे का?”परमेश्वर म्हणाला, “शौल कोठारामागे लपून बसला आहे.”

1 शमुवेल 15:1

एक दिवस शमुवेल शौलला म्हणाला, “इस्राएलचा राजा म्हणून तुला राज्याभिषेक करायला परमेश्वराने मला पाठवले. आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐक.

होशेय 13:1

इस्राएलमध्ये एफ्राईमने स्वत:चे महत्व वाढविले तो बोलत असे व लोक भीतीने थरथर कापत. पण एफ्राईमने पाप केले त्याने बआल देवताला पूजणे सुरु केले.

मत्तय 18:4

म्हणून जो कोणी आपणांला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे.

Interlinear

Choose Theme