Home Bibles गणना 9:12 · मराठी बायबल
गणना 9:12 · मराठी बायबल

त्याने भोजनातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये; तसेच त्याने कोंकऱ्याचे कोणतेही हाड मोडू नये. त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळावेत.

Cross references

निर्गम 12:10

त्या रात्रीच ते सर्व मांस खावे; त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि जर काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.”

निर्गम 12:43

परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, “वल्हांडण सण पाळण्याविषयीचे नियम असे आहेत. कोणाही परदेशी माणसाने वल्हांडणाचे भोजन खाऊ नये.

निर्गम 12:46

“प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये.

गणना 9:3

ह्या महिन्यात चौदाव्या दिवशी सूर्य मावळल्यानंतर अंधार पडण्या अगोदर-संधी प्रकाशात-त्यांनी वल्हांडण सणाचे भोजन करावे. त्यांनी ते ठरलेल्यावेळी आणि वल्हांडण सण पाळण्याच्या नियमाप्रमाणे करावे.”

योहान 19:36

या गोष्टी अशासाठी घडल्या की, पवित्र शास्त्राची परिपूर्ती व्हावी: “त्याचे एकही हाड मोडणार नाही.”

Interlinear

Choose Theme