Home Bibles निर्गम 12:46 · मराठी बायबल
निर्गम 12:46 · मराठी बायबल

“प्रत्येक इस्राएली कुटुंबाने आपले वल्हांडण सणाचे भोजन एकाच घरात खाल्ले पाहिजे; ते भोजन घराबाहेर नेऊ नये. यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये.

Cross references

गणना 9:12

त्याने भोजनातील काहीही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये; तसेच त्याने कोंकऱ्याचे कोणतेही हाड मोडू नये. त्याने वल्हांडण सणाचे सर्व नियम पाळावेत.

स्तोत्रसंहिता 34:20

परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. त्यांचे एकही हाड तो मोडू देणार नाही.

स्तोत्रसंहिता 34:21

परंतु संकटे वाईट माणसांना मारुन टाकतील चांगल्या माणसांच्या सगळ्या शत्रूंचा नाश होईल.

योहान 19:33

पण जेव्हा ते येशूकडे आले. तेव्हा त्यांना आढळून आले की, तो अगोदरच मेला आहे. तेव्हा त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.

योहान 19:36

या गोष्टी अशासाठी घडल्या की, पवित्र शास्त्राची परिपूर्ती व्हावी: “त्याचे एकही हाड मोडणार नाही.”

1 करिंथकरांस 12:12

कारण ज्याप्रमाणे आपणातील प्रत्येकाला एकच शरीर आणि त्याला अनेक अवयव असतात, आणि तरीही सर्व अवयव जरी ते पुष्कळ असले तरी त्यांचे मिळून एक शरीर बनते. तसाच ख्रिस्तसुद्धा आहे.

इफिसकरांस 2:19

यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात.

Interlinear

Choose Theme