Home Bibles गणना 7:9 · मराठी बायबल
गणना 7:9 · मराठी बायबल

मोशेने कहाथी वंशाच्या लोकांना बैल किंवा गाड्या दिल्या नाहीत; कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.

Cross references

गणना 3:31

पवित्र कराराचा कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या, पवित्र मंडपात सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व सामान ह्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.

गणना 4:4

दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तूची त्यांनी काळजी घ्यावी.

गणना 4:15

“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत.

2 शमुवेल 6:3

अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा पवित्र कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे मुलगे उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.

2 शमुवेल 6:6

ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला.

2 शमुवेल 6:13

कोश वाहून नेणारे लोक सहा पावले चालून गेल्यावर दावीदाने एक बैल आणि एक धष्टपुष्ट गोऱ्हा यांचा बळी दिला.

1 इतिहास 15:3

या जागेपाशी करारकोश आणायला म्हणून दावीदाने यरुशलेममधील सर्व इस्राएल लोकांना एकत्र बोलावले.

1 इतिहास 15:13

गेल्या वेळी हा कोश कसा आणवा याबद्दल आपण परमेश्वराला विचारले नाही. तुम्हा लेवींनी तो आणला नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला ती शिक्षा दिली.”

1 इतिहास 23:26

तेव्हा लेवींना पवित्र निवासमंडप आणि उपासनेतील इतर उपकरणे सतत बाळगण्याची गरज नाही.”

Interlinear

Choose Theme