Home Bibles 2 शमुवेल 6:3 · मराठी बायबल
2 शमुवेल 6:3 · मराठी बायबल

अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा पवित्र कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे मुलगे उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.

Cross references

गणना 4:5

“इस्राएल लोक आपला तळ नवीन जागी हलवितील तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपात जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने पवित्र कराराचा कोश झाकावा.

गणना 7:4

परमेश्वर मोशेला म्हणाला,

गणना 7:9

मोशेने कहाथी वंशाच्या लोकांना बैल किंवा गाड्या दिल्या नाहीत; कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.

1 शमुवेल 6:7

“एक नवीन गाडी तयार करुन नुकत्याच व्यायलेल्या दोन गाई तिला जुंपा त्या गाईंनी शेतात कधीच काम केलेले नसावे. त्यांच्यावर जू चढवून मग त्यांची वासरे माघारी गोठ्यात आणून बांधा. त्यांना आपल्या आईच्या मागे जाऊ देऊ नका.

1 शमुवेल 7:1

किर्याथ यारीमचे लोक आले आणि परमेश्वराचा तो पवित्र कोश घेऊन गेले. त्यांनी तो डोंगरावरील अबीनादाबच्या घरात ठेवला. त्या परमेश्वराच्या कोशाची जपणूक करण्यासाठी त्यांनी अबीनादाबचा मुलगा एलाजार याला विधिवत पवित्र केले.

स्तोत्रसंहिता 132:6

आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले. आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.

Interlinear

Choose Theme