Home Bibles लेवीय 9:1 · मराठी बायबल
लेवीय 9:1 · मराठी बायबल

आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना (पुढाऱ्यांना) बोलावले.

Cross references

लेवीय 8:33

तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये.

लेवीय 14:10

“आठव्या दिवशी त्या माणसाने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला चोवीसवाट्या-तीन दशांश एफा-मैदा, व दोन तृतीय अंश पिंट-एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;

लेवीय 14:23

“आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.

लेवीय 15:14

आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.

लेवीय 15:29

मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.

गणना 6:10

आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले आणून दर्शनमंडपाच्या दारापाशी ती याजकाला द्यावीत.

यहेज्केल 43:26

सात दिवस, याजक, वेदीची शुद्धता करतील. मग ते वेदी देवाच्या उपासनेसाठी तयार करतील.

यहेज्केल 43:27

वेदी तयार करुन, परमेश्वराला अर्पण करण्यात सात दिवस जातील. आठव्या दिवसापासून, याजक होमार्पणे व शांत्यर्पणे करु शकतील आणि मी तुमचा स्वीकार करीन.” असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला.

मत्तय 28:1

शब्बाथवारानंतरचा पहिला दिवस आला. पहाटेस मरीया मग्दालिया, मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहावयास तेथे गेल्या.

Interlinear

Choose Theme