Home Bibles गणना 33:49 · मराठी बायबल
गणना 33:49 · मराठी बायबल

त्यांनी यार्देन नदीच्या यार्देन खोऱ्यात तंबू ठोकले. त्यांचे तंबू बेथ-यारीमोथापासून अकाशीयाच्या शेतापर्यंत होते.

Cross references

निर्गम 25:5

लाल रंगविलेली मेढ्यांची कातडी; तहशाची कातडी बाभळीचे लाकूड;

निर्गम 25:10

“बाभळीच्या लाकडाची एक पेटी किंवा पवित्रकोश तयार करावा; त्याची लांबी पंचेचाळीस इंच, रुंदी सत्तावीस इंच व उंची सत्तावीस इंच असावी.

निर्गम 25:23

“बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनवावे; ते छत्तीस इंच लांब आठरा इंच रूंद व सत्तावीस इंच उंचीचे असावे.

गणना 25:1

इस्राएल लोक शिद्दीमात रहात असताना त्यांनी मवाबच्या बायकांबरोबर लैंगिक पाप करायला सुरुवात केली.

यहोशवा 2:1

नूनाचा मुलगा यहोशवा आणि सर्व लोक यांचा तळ शिट्टीम (अकेशिया) येथे होता. तेव्हा कोणाच्याही नकळत यहोशवारे दोन हेर पाठवले. “तुम्ही जाऊन तो देश व विशेषत: यरीहो पाहून या.” असे सांगून त्याने त्या दोन हेरांना पाठवले.त्या प्रमाणे ती माणसे यरीहोला गेली. रहाब नावाच्या एका वेश्येच्या घरी ते जाऊन राहिले.

यहोशवा 13:20

बेथ-पौर, पिसगाची उतरणी आणि बेथ-यशिमोथ.

यहेज्केल 25:9

मी मवाबचा खांदा कापीन. देशाला भूषणावह असलेली बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही सीमेवरची शहरे मी काढून घेईन.

Interlinear

Choose Theme