“बाभळीच्या लाकडाची एक पेटी किंवा पवित्रकोश तयार करावा; त्याची लांबी पंचेचाळीस इंच, रुंदी सत्तावीस इंच व उंची सत्तावीस इंच असावी.
Cross references
दर्शनमंडप आज्ञापटाचा कोश, त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान;
मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होता.
अशा प्रकारे पवित्र निवास मंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले.
मग त्यांनी ह्या सर्वावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व मग कराराच्या कोशाला दांडे लावावे.
“तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. ‘त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडी पेटीही कर’ असे ही सांगितले.
“मग मी बाभळीच्या लाकडाची पेटी केली. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या.
शलमोनाने फारोच्या मुलीला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा करारकोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत. तेव्हा माझ्या बायकोने दावीद नगरात राहू नेये.”
त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष).ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या.
मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट,भूकंप व गारांचे वादळ झाले.