गणना 33:37 · मराठी बायबल
लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.
Cross references
गणना 20:16
पण आम्ही परमेश्वराकडे मदतीची याचना केली. परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठविले. परमेशवराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.“आता आम्ही कादेशमध्ये आहोत. इथे तुझा प्रदेश सुरु होतो.
गणना 20:22
इस्राएलचे सर्व लोक कादेशहून होर पर्बताकडे गेले.
गणना 21:4
इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले.