Home Bibles गणना 33:36 · मराठी बायबल
गणना 33:36 · मराठी बायबल

लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन वाळवंटात कादेश येथे तंबू ठोकले.

Cross references

गणना 13:21

म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला.

गणना 13:26

इस्राएल लोकांची छावणी पारानच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या सर्व लोकांजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली.

गणना 20:1

इस्राएलचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले.

गणना 27:14

जेव्हा लोक त्सीनच्या वाळवंटात पाण्यासाठी रागावले होते तेव्हा तुम्ही दोघांनी. तू आणि अहरोनाने माझ्या आज्ञा पाळायला नकार दिला. तुम्ही मला मान दिला नाही आणि लोकांना मी पवित्र आहे असे दाखवले नाही.” (हे त्सीनच्या वाळवंटात कादेश जवळ मरिबाच्या पाण्याजवळ घडले.)

अनुवाद 32:51

कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरुद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा मान राखला नाही तसेच मला पवित्र मानले नाही.

Interlinear

Choose Theme