Home Bibles गणना 3:15 · मराठी बायबल
गणना 3:15 · मराठी बायबल

“लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”

Cross references

गणना 1:3

वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वाची त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.

गणना 1:47

इस्राएल लोकांबरोबर लेवी कुळांच्या दलातील लोकांची करण्यात आली नाही.

गणना 3:22

ह्या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.

गणना 3:28

हया कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.

गणना 3:34

ह्या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वचाये मुलगे व पुरुष सहा हजार दोनशें होते.

गणना 3:39

लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष ह्यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीयांची एकूण संख्या बावीस हजार भरली.

गणना 3:40

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर;

गणना 3:43

मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल मुलगे व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.

गणना 18:15

“स्त्रिचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वराला अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.

गणना 26:57

त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती:गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ. कहाथचे कहाथी कूळ मरारीचे मरारी कूळ.

गणना 26:62

लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.

2 इतिहास 31:17

याजकांना त्यांच्या वाटणीचा हिस्सा मिळत असे. ज्या लेवींची आपापल्या पितृकुळाप्रमाणे नोंद झाली होती त्यांना आणि किमान वीस वर्षे किंवा त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लेवींना त्यांची वाटणी मिळत असे. त्यांच्यावरील जबाबदारीचे स्वरुप आणि त्यांचा गट यावर त्याचे प्रमाण ठरत. असे.

नीतिसूत्रे 8:17

मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.

यिर्मया 2:2

“यिर्मया, जा आणि यरुशलेममधील लोकांशी बोल. त्यांना सांग:“तुमचे राष्ट्र तरुण होते त्या वेळी तुम्ही माझ्याशी निष्ठावंत होता. नववधूप्रमाणे तुम्ही मला अनुसरलात. तुम्ही वाळवंटातून आणि पडिक जमिनीतून माझ्या मागे आलात.

यिर्मया 31:3

खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल. परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील. तुमची निष्ठ मी कायमची सांभाळीन.

मार्क 10:14

येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावाला आणि त्यांना म्हणाला, लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे.

2 तीमथ्थाला 3:15

तुला माहीत आहे की, तू आपल्या अतिबाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्र वचनांची माहिती आहे. त्यांच्या ठायी तुला शहाणे बनविण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. ते तुला तारणाकडे नेण्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास समर्थ आहे.

Interlinear

Choose Theme