अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
Cross references
1हे सर्वजण आपापल्या घराण्याचे प्रमुख होते; लोकांनीही त्यांना आपापल्या कुळाचे सरदार म्हणून निवडले.
कोरह, दाथान, अबीराम आणि ओन मोशेच्या विरुद्ध गेले. (कोरह इसहारचा मुलगा होता. इसहार कहाथचा मुलगा होता आणि कहाथ लेवीचा मुलगा होता. दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते.)
या चार माणसांनी इस्राएल मधून 250 माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरुद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांना माहीत होते.
म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली. जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले. नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले.
या लोकांसाठी हे फार वाइट आहे! काईनानेजो मार्ग धरला तोच यांनी धरलेला आहे. आपला फायदा व्हावा म्हणून ते बलामाप्रमाणे गोंधळून मोकाट धावत सुटले आहेतआणि कोरहाच्या बंडाळीत भाग घेणाऱ्या लोकांचा नाश झाला तसाच या लोकांचा देखील नाश होत आहे.