कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.
Cross references
तेव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुक्कोथ येथे गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते.
मी त्यांच्या पूर्वजांना वचन दिले. मी त्यांना तो प्रदेश देण्याचे वचन दिले. पण त्यांच्यापैकी जे लोक माझ्याविरुद्ध गेले ते कधीही त्या प्रदेशात पाऊल टाकणार नाहीत.
म्हणून तू त्यांना सांग, ‘ज्याविषयी तुम्ही तक्रार करत. त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला करील. तुम्हाला पुढील गोष्टी होतील.
तुम्ही या वाळवंटात मराल. वीस वर्षांचा किंवा त्याहून मोठा असलेला आणि माझ्या लोकापैकी असलेला प्रत्येक जण मरेल. तुम्ही माझ्याविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध तक्रार केली आहे.
आणि तुमच्याबद्दल बोलायचे तर तुम्ही या वाळवंटात मराल.
“मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट माणसांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरुद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या वाळवंटात मरतील.”
यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो प्रदेश शोधायला पाठवलेल्या लोकांत होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. ज्या आजाराने इतर सर्वजण मेले, तो आजार त्या दोघांना झाला नाही.
“आम्ही वाळवंटातून प्रवास करीत असताना आमचे वडील गेले. त्यांना नैसर्गिक मरण आले. ते कोरहाच्या समूहाला मिळण्यांपैकी नव्हते (कोरह हा परमेश्वराच्या विरुद्ध जाणाऱ्यापैकी होता.) पण आमच्या वडिलांना एकही मुलगा नव्हता.
कादेश-बणर्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोंचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या गोटातील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने हे भाकित केलेच होते.
“मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील.
यहोशवाने त्यांची सुंता करण्याचे कारण असे ; इस्राएल लोकांनी मिसर सोडले तेव्हा सर्व लढवय्या पुरूषांची सुंता झालेली होती. वाळवंटात असताना यापैकी बऱ्याच जणांनी परमेश्वराचे ऐकले नाही. तेव्हा धांन्याने संपन्न असा हा देश या लोकांना पाहायला मिळणार नाही असे परमेश्वराने शपथपूर्वक सांगितले हा देश आपल्याला देण्याचे परमेश्वराने आपल्या पूर्वजांना वचन दिले होते. पण या लोकांमुळे परमेश्वराने सर्वांना या वाळवंटात चाळीस वर्षे रखडवले. या काळात ही माणसे मरून जावीत म्हणूव अशा प्रकारे त्या लढण्यास पात्र अशा माणसांचा त्या काळात मृत्यू झाला आणि त्यांच्या मुलांनी त्यांची जागा घेतली. पण त्या प्रवासात, वाळवंटात जन्मलेल्या मुलांपैकी कोणाचीच सुंता झाली नव्हती म्हणून यहोशवाने हे काम केले.
एकदा यहूदा वंशातील काही लोक गिलगाल येथे यहोशवाकडे आले. कनिज्जी यकुन्नेचा मुलगा कालेब हाही त्यांच्यात होता. तो यहोशवाला म्हणाला, “कादेश-बर्ण्या येथे परमेश्वर काय म्हणाला ते तुला आठवते ना? तो आपला सेवक मोशे याच्याशी बोलत होता. आपल्या दोघांविषयी ते बोलणे होते.
का? कारण दुष्टांचा नाश होणार आहे. परंतु जे लोक परमेश्वराकडे मदतीची याचना करतात त्यांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल.
तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल.
परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता, आणि त्यांना अरण्यात ठार मारण्यात आले.
आणि तो (देव) कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.
जरी तुम्हांला या गोष्टी माहीत असल्या तरी मला तुम्हांला आठवण करुन द्यावीशी वाटते की, ज्या प्रभूने आपल्या लोकांनाएकदा इजिप्त देशातून सोडवून आणल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारले; अशांचा त्याने नंतर नाश केला