“मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील.
Cross references
ज्या प्रदेशामधून तू जात आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजाला कायमचा देईन आणि मी तुमचा देव होईन.”
“कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यात जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्ठा पाडला,
नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या वाळवंटातील डोंगरावर जा. मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती तुला तेथे दिसेल.
अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू ठोकले.
मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसग पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व प्रदेश दाखवला.
तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी राजाला (देवाला) त्याच्या सुंदर रूपात पाहाल. तुम्ही महान भूमी पाहाल.
“यहूदा, लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत. अबारीमच्या डोंगरात तुझा आवाज ऐकू जाऊ देत. अबारीमच्या डोंगरात जाऊन मोठ्याने ओरड. का? कारण तुझ्या सर्व “प्रियकराचा’ नाश केला जाईल.
आता आम्हांला माहीत आहे की, जेव्हा जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले, तर आम्हाला देवापासून मिळलेले अनंतकाळचे घर स्वर्गात आहे. ते मानवी हातांनी बांधलेले नाही.