म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
Cross references
तेव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघून रामसेस येथून प्रवास करीत सुक्कोथ येथे गेले. मुलेबाळे सोडून ते सर्वजण मिळून सुमारे सहा लाख होते.
वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि प्रत्येकाला एक बेका चांदी (म्हणजे पवित्र स्थानाच्या अधिकृत मापाप्रमाणे “अर्धा शेकेल” चांदी) कर म्हणून द्यावी लागली.
ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.
अशी ही इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशें पन्नास होती.
मोशे म्हणाला, “परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की ‘ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!’
त्यांच्या वंशजांची संख्या तू आकाशातील तारकाप्रमाणे विपुल केलीस. त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशापर्यंत त्यांना तू नेऊन पोचवलेस. त्यांनी पुढे जाऊन तो प्रदेश ताब्यात घेतला.
या सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत हे सर्वांना ठाऊक आहे.
देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांना ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत.
देव विश्र्वासू उपदेशकांना गप्प बसवतो आणि वृध्दांची विद्वत्ता काढून घेतो.
तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.