तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.
Cross references
दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे.
इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला.
ढग जर पवित्र निवास मंडपावर दोन दिवस, किंवा महिनाभर किंवा वर्षभर राहिला तर लोक परमेश्वराची आज्ञा मानून तेथेच राहात असत आणि ढग हाले पर्यंत तेथून हालत नसत, मग ढग जेव्हा आपल्या जागेवरुन हाले तेव्हा लोकही तळ हलवीत.
तुम्ही येथे येईपर्यंत रानावनातून तुम्हाला त्याने कसे आणले हे तुम्हाला माहीत आहेच.
नंतर देवाने इस्राएलला मेंढपाळा सारखे नेले. त्याने त्याच्या लोकांना मेंढ्यासारखे वाळवंटात नेले.
इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक. तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस. राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस. आम्हाला तुला बघू दे.
परमेश्वर समुद्रातून मार्ग काढील. त्याच्या लोकांकरिता खवळलेल्या पाण्यातून तो रस्ता तयार करील. देव म्हणतो,
पण पूर्वी काय घडले याची परमेश्वराला अजून आठवण आहे. मोशे आणि त्याची माणसे त्याला आठवतात. त्यांना समुद्रपार करणारा तोच एकमेव परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याच्या मेंढपाळांना (संदेष्ट्यांना) कळप (माणसे) वळवायला लावले. पण मोशेला आपला आत्मा देणारा तो परमेश्वर आता कोठे आहे?
पण परमेश्वराने संदेष्ट्यांच्या उपयोग करून देवाने इस्राएलला सुरक्षित ठेवले.
पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
“मोशे हाच तो मनुष्य होता, ज्याला यहूदी लोकांनी नाकारले. ‘तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय?’ असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासनकर्ता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते.