Home Bibles गणना 23:12 · मराठी बायबल
गणना 23:12 · मराठी बायबल

पण बलाम म्हणाला, “परमेश्वर जे सांगले तेच मी बोलायला पाहिजे.”

Cross references

गणना 22:20

त्या रात्री देव बलामकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्या बरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”

गणना 22:38

बलामने उत्तर दिले, “पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेत तेवढेच मी बोलू शकतो.

गणना 23:3

नंतर बलाम बालाकाला म्हणाला, “या वेदीजवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल.” नंतर बलाम उंच जागी गेला.

गणना 23:20

परमेश्वराने मला त्या लोकांना आशीर्वाद द्यायला सांगितले, परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. म्हणून मी ते बदलू शकत नाही.

गणना 23:26

बलाम उत्तरला, “मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगले तेच मला बोलता येईल.”

गणना 24:13

“बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेव्हढीच मी बोलतो.’ तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या माणसांना सांगितले होते.

नीतिसूत्रे 26:25

तो ज्या गोष्टी सांगतो त्या जरी चांगल्या वाटल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. त्याचे मन दुष्ट कल्पनांनी भरलेले आहे.

रोमकरांस 16:18

असे लोक आपल्या प्रभूची सेवा करीत नाहीत, परंतु स्वत:च्या पोटाची सेवा करतात. आपल्या मधुर व खुशामत करणाऱ्या भाषणाने भोळ्या लोकांची फसवणूक करता.

तीताला 1:16

ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात. ते अमंगळ व आज्ञा मोडणारे, व कोणतेच चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे.

Interlinear

Choose Theme