Home Bibles गणना 16:28 · मराठी बायबल
गणना 16:28 · मराठी बायबल

नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हांला दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हांला दाखवीन.

Cross references

निर्गम 3:12

देव म्हणाला, “हे तू करु शकशील, कारण मी तुजबरोबर असेन मी तुला पाठवीत आहे याचा पुरावा असा असेल; तू इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणल्यावर या डोंगरावर येऊन माझी उपासना करशील.”

निर्गम 4:1

मग मोशे देवाला म्हणला, “तू मला पाठवले आहेस असे मी इस्राएल लोकांना सांगेन तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत; ते म्हणतील, ‘परमेश्वराने तुला दर्शन दिले नाही.”‘

निर्गम 7:9

“फारो तुम्हाला मी पाठविल्याचा पुरावा म्हणून एखादा चमत्कार करून तुमचे सामर्थ्य दाखविण्या विषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी जमिनीवर टाकण्यास सांग म्हणजे फारोच्या देखत त्या काठीचा साप होईल.

गणना 24:13

“बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेव्हढीच मी बोलतो.’ तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या माणसांना सांगितले होते.

अनुवाद 18:22

तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.

1 राजे 18:36

दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करुन दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.

यिर्मया 23:16

सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो: “हे संदेष्टे तुम्हाला जे काय सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. ते दृष्टांन्ताबद्दल बोलतात. पण हे दृष्टांन्त त्यांना माझ्याकडून घडत नाहीत, तर ते त्यांच्या मनाचेच असतात.

यहेज्केल 13:17

देव म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल मधील स्त्री संदेष्ट्यांकडे पाहा. त्या माझ्यावतीने बोलत नाहीत. त्या त्यांच्या मनाचेच सांगतात. म्हणून तू माझ्यावतीने त्यांच्याविरुद्ध बोल. तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस.

जखऱ्या 2:9

बाबेलच्या लोकांनी माझ्या लोकांना कैदी म्हणून पकडून नेले. आणि त्यांना गुलाम बनवले. पण मी त्यांचा पराभव करीन आणि ते माझ्या लोकांचे गुलाम होतील. तेव्हा तुम्हाला पटेल की सर्वशक्तिमान परमेश्वराने मला पाठविले आहे.”

जखऱ्या 4:9

“जरुब्बाबेल माझ्या मंदिराचा पाया घालेल. तो जेव्हा मंदिर बांधून पूर्ण करील तेव्हा तुम्हाला समजेल की सर्व शक्तिमान परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठविले आहे.

योहान 5:30

“मी एकटा काहीच करु शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वत:च्या समाधानासाठी नाही; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो.”

योहान 5:36

“परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गेष्टींवरुन हे सिद्ध होते की, पित्याने मला पाठविले आहे.

योहान 6:38

मी स्वर्गातून खाली आलो, ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. मला पाहिजे ते करायला मी आलो नाही.

योहान 11:42

आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठवावा.”

योहान 14:11

मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.

Interlinear

Choose Theme