Home Bibles यिर्मया 23:16 · मराठी बायबल
यिर्मया 23:16 · मराठी बायबल

सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो: “हे संदेष्टे तुम्हाला जे काय सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. ते दृष्टांन्ताबद्दल बोलतात. पण हे दृष्टांन्त त्यांना माझ्याकडून घडत नाहीत, तर ते त्यांच्या मनाचेच असतात.

Cross references

1 राजे 22:11

त्यांच्यापैकी एक कनानाचा मुलगा सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबला म्हणाला, “‘परमेश्वराचे म्हणणे, ‘ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस’ असे देवाचे म्हणणे आहे. म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.”

2 राजे 17:15

या लोकांनी परमेश्वराने पूर्वजांशी केलेले करार आणि नियम धुडकावून लावले. परमेश्वराने बाजवून सांगितले तिकडे दुर्लक्ष केले. क्षुद्र दैवतांच्या नादी लागून त्यांनी काहीच साधले नाही. आपल्या भोवतालच्या राष्ट्रांचे त्यांनी अनुकरण चालवले. परमेश्वराने इस्राएल लोकांना जे करु नका म्हणून सांगितले होत तेच ही राष्ट्रे करत होती.

2 इतिहास 18:5

तेव्हा राजा अहाबने सुमारे चारशे संदेष्ट्यांना बोलावून विचारले, “आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही?” तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबला म्हणाले, “जरुर जा. कारण परमेश्वर रामोथ - गिलादचा पराभव करील.”

नीतिसूत्रे 19:27

तुम्ही जर सुचना ऐकायला नकार दिलात तर तुम्ही मूर्खासारख्या चुका करत राहाल.

यिर्मया 2:5

परमेश्वर असे म्हणतो: “मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का? म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का? त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना पूजले व स्वत: कवडीमोल झाले.

यिर्मया 9:20

आता, यहूदातील स्त्रियांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. परमेश्वराच्या तोंडचे शब्द ऐका. देव म्हणतो, “तुमच्या मुलींना मोठ्याने रडायला शिकवा. प्रत्येक बाईला शोकगीत गाता आलेच पाहिजे.

यिर्मया 14:14

मग परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना आज्ञा केली नाही वा त्यांच्याशी बोललोही नाही. ते लोकांपुढे खोटे दृष्टान्त सांगतात, त्यांना मोहजालात फसवितात व स्वत:चे स्वप्नरंजन करतात.

यिर्मया 23:21

मी त्या संदेष्ट्यांना पाठविले नाही, पण तेच संदेश द्यायला धावले. मी त्यांच्याशी बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने उपदेश करतात.

यिर्मया 23:26

हे किती काळ चालणार? ते खोट्याचाच विचार करतात आणि त्याच खोट्या, असत्य गोष्टी लोकांना शिकवितात.

यिर्मया 27:9

तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही’ असे सांगतात.”

यिर्मया 27:14

पण खोटे संदेष्टे सांगतात की तुम्हाला कधीच बाबेलचे गुलाम व्हावे लागणार नाही.“त्यांचे मुळीचे ऐकू नका. कारण ते तुम्हाला खोटा उपदेश करतात.

यिर्मया 29:8

सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका.

यिर्मया 29:23

त्या दोघा संदेष्ट्यांनी इस्राएलमध्ये फार वाईट कृत्ये केली. शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर त्यांनी व्यभिचार केला. त्यांनी खोटे सांगितले आणि माझा संदेश खोटे असल्याचे लोकांना सांगितले मी त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या नव्हत्या त्यांनी काय केले आहे, ते मला माहीत आहे मी त्याला साक्षी आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यहेज्केल 13:3

परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की दुष्ट संदेष्ट्यांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही दृष्टान्तांत पाहिलेल्या गोष्टी लोकांना न सांगता, तुमच्या मनाचेच सांगता.

यहेज्केल 13:6

“खोट्या संदेष्ट्यांनी दृष्टान्त पाहिल्याचे सांगितले. ते जादू करतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. पण ते खोटे बोलतात. त्यांना परमेश्वराने पाठविल्याचे ते सांगतात. पण ते खोटे आहे. खोटे खरे ठरावे म्हणून ते अजूनही वाट पाहत आहेत.

यहेज्केल 13:16

“ह्या सर्व गोष्टी इस्राएलच्या खोट्या संदेष्ट्यांबाबत घडतील. ते यरुशलेमच्या लोकांशी बोलतात. ते शांतीचे भाकीत करतात. पण शांती मिळत नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभुने, हे सांगितले.

यहेज्केल 13:23

तेव्हा ह्यापुढे तुम्हाला तुमचे निरर्थक दृष्टान्त दिसणे बंद होईल तुम्ही जादूही करणार नाही. तुमच्यापासून मी माझ्या लोकांचे रक्षण करीन. मग तुम्हाला कळेल की मीच खरा परमेश्वर आहे.”

यहेज्केल 22:28

“संदेष्टे लोकांना ताकीद देत नाहीत. ते सत्य झाकून ठेवतात. हे संदेष्टे, तटबंदीची दुरुस्ती न करता, वरवर गिलावा देऊन भगदाडे बुजविणाऱ्या, कामगारांप्रमाणे आहेत. त्यांना फक्त खोटेच दिसते. ते मंत्र-तंत्राच्या आधारे भविष्य जाणून घेतात, पण लोकांशी फक्त खोटेच बोलतात. ते म्हणतात ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो.’ पण हे सर्व खोटे आहे. परमेश्वर त्यांच्याशी बोललेला नाही.

मीखा 2:11

ह्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही. पण एखादा खोटे सांगू लागला, तर ते स्वीकारतील. जर खोटा संदेष्टा येऊन म्हणाला, “भविष्यकाळात चांगले दिवस येतील, द्राक्षरस आणि मद्याचा सुकाळ होईल, तर ते त्या खोट्या प्रेषितावर विश्वास ठेवतील.”

मत्तय 7:15

“खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण प्रत्यक्षात ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.

रोमकरांस 1:21

कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंत;करणे अंधकारमय झाली.

2 करिंथकरांस 11:13

कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रुप धारण करणारे आहेत

गलतीकरांस 1:8

आम्ही तुम्हाला सांगितली त्याहून निराळी सुवार्ता आम्ही किंवास्वर्गातील दूतांनी जर तुम्हांला सांगितली तर देवाचा शाप त्याच्यावर येवो.

1 योहान 4:1

प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेष्ट्याचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांचीपरीक्षा करा व ते (खरोखर) देवापासून आहेत का ते पाहा. मी हे तुम्हांला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघालेआहेत.

Interlinear

Choose Theme