Home Bibles गणना 14:2 · मराठी बायबल
गणना 14:2 · मराठी बायबल

इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सगळे लोक एकत्र आले आणि मोशेला व अहरोनाला म्हणाले, “आम्ही मिसरमध्ये किंवा वाळवंटात मरुन जायला हवे होते. या नवीन प्रदेशात मारले जाण्यापेक्षा ते अधिक चांगले झाले असते.

Cross references

निर्गम 14:11

ते मोशेला म्हणाले, “तू आम्हाला मिसरमधून येथे रानात मरावयास का आणले? आम्ही शांतीने मिसरमध्ये मरण पावलो असतो आणि आमच्या कबरांसाठी तेथे भरपूर जागा होती;

निर्गम 15:24

लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”

निर्गम 16:2

लोक पुन्हा, रानात मोशे व अहरोन यांच्याकडे कुरकुर करु लागले;

निर्गम 17:3

परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुलेबाळे, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय?”

गणना 11:1

मग इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल परत तक्रार करु लागले. ती परमेश्वराने ऐकली व ती ऐकल्यावर त्याचा राग भडकला. परमेश्वरापासूनचा अग्नि त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या कडेचा काही भाग जाळून टाकिला.

गणना 11:15

त्यांचा त्रास मी सहन करण्याचे काम चालू ठेवावे असा जर तुझा विचार असेल तर मग तू आजच मला मारुन टाक. तू मला दास समजत असशील तर मग आता मला मरु दे. मग माझ्या मागचा सर्व त्रास संपून जाईल!

गणना 14:27

“हे वाईट लोक किती काळ माझ्याविरुद्ध तक्रार करीत राहणार आहेत? मी त्यांच्या तक्रारी आणि कुरकुरी ऐकलेल्या आहेत.

गणना 14:28

म्हणून तू त्यांना सांग, ‘ज्याविषयी तुम्ही तक्रार करत. त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला करील. तुम्हाला पुढील गोष्टी होतील.

गणना 16:41

दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनविरुद्ध तक्रार केली. ते म्हणाले, “तुम्ही परमेश्वराची माणसे मारली.”

गणना 17:6

म्हणून मोशे इस्राएलच्या लोकांशी बोलला. प्रत्येक वंश प्रमुखाने त्याला काठी दिली. त्या 12काठ्या होत्या. प्रत्येक वंश प्रमुखाकडून एकेक काठी आली. एक काठी अहरोनची होती.

गणना 20:2

त्या ठिकाणी लोकांना पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले.

अनुवाद 1:27

तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात की परमेश्वर आमचा द्वेष करतो. अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हाला त्याने मिसर देशातून बाहेर काढले.

अनुवाद 9:23

परमेश्वराने तुम्हाला कादेश-बर्ण्या सोडण्यास सांगितले तेव्हाही तुम्ही त्याचे ऐकले नाहीत. त्याने तुम्हाला तो देत असलेला प्रदेश काबीज करायला सांगितले पण त्याचे सांगणे ऐकले नाहीत. त्याच्यावर भरवसा ठेवला नाहीत. त्याची आज्ञा पाळली नाहीत.

1 राजे 19:4

तो पुढे दिवसभर वाळवंट तुडवत गेला. एका झुडुपाखाली तो बसला. आता मरण यावे असे त्याला वाटले. एलीया म्हणाला, “आता हे पुरे झाले, परमेश्वरा! मला आता मरु दे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे?”

ईयोब 3:11

मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही? मी जन्मत:च का मेलो नाही?

ईयोब 7:15

म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो.

स्तोत्रसंहिता 106:24

परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला. त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला.

स्तोत्रसंहिता 106:45

देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.

योना 4:3

म्हणून आता मी, परमेशवरा. तुला मला ठार मारण्याची विनंती करतो. माझ्या दृष्टीने जगण्यापेक्षा मरणे बरे!”

योना 4:8

सूर्य डोक्यावर असताना, परमेशवराने गरम पूर्वेचा वारा निर्माण केला. त्याने मरणासाठी परमेशवराची विनवणी केली तो म्हणाला माझ्या मताने जगण्यापेक्षा मरणे बरे!”

1 करिंथकरांस 10:10

कुरकूर करु नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाल की, मृत्युदूताकडून ते मारले गेले.

फिलिप्पैकरांस 2:14

प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा, यासाठी की,

यहूदा 1:16

हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत, ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढायामारणारे लोक आहेत, ते आपल्या फायद्यासाठी इतरंचा तोंडपूजेपणा करतात.

Interlinear

Choose Theme