Home Bibles गणना 13:30 · मराठी बायबल
गणना 13:30 · मराठी बायबल

मोशेजवळच्या लोकांना गप्प बसायला सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.”

Cross references

गणना 14:6

यहोशवा आणि कालेब यांनी आपले कपडे फाडले (तक्रारी ऐकून झालेल्या दु:खप्रदर्शनासाठी) नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे ही या प्रदेशाच्या शोधात गेलेल्या लोकांपैकी होते.

गणना 14:7

या दोघांनी तिथे जमलेल्या इस्राएल लोकांना सांगितले, “आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे.

गणना 14:9

म्हणून परमेश्वराविरुद्ध जाऊ नका. त्या प्रदेशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपण त्यांचा पराभव करु शकू. त्यांच्याकडे कसलेही संरक्षण नाही. सुरक्षित राहण्यासाठी काहीही नाही. परंतु आपल्याजवळ परमेश्वर आहे. म्हणून घाबरु नका.”

गणना 14:24

पण माझा सेवक कालेब वेगळा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून मी त्याला त्याने आधी पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाईन. आणि त्याच्या वंशजांना तो प्रदेश मिळेल.

यहोशवा 14:6

एकदा यहूदा वंशातील काही लोक गिलगाल येथे यहोशवाकडे आले. कनिज्जी यकुन्नेचा मुलगा कालेब हाही त्यांच्यात होता. तो यहोशवाला म्हणाला, “कादेश-बर्ण्या येथे परमेश्वर काय म्हणाला ते तुला आठवते ना? तो आपला सेवक मोशे याच्याशी बोलत होता. आपल्या दोघांविषयी ते बोलणे होते.

यहोशवा 14:7

परमेश्वराचा सेवक मोशे याने देशाची टेहेळणी करायला मला पाठवले होते. मी तेव्हा चाळीस वर्षांचा होतो. मला त्या देशाविषयी काय वाटते ते मी परत आल्यावर मोशेला सांगितले.

स्तोत्रसंहिता 27:1

परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही.

स्तोत्रसंहिता 60:12

फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो. 13

स्तोत्रसंहिता 118:10

बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.

यशया 41:10

काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.

रोमकरांस 8:31

यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण?

रोमकरांस 8:37

तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत.

फिलिप्पैकरांस 4:13

जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्यार द्धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.

इब्री लोकांस 11:33

लोकांनी विश्वासाने राज्ये जिंकली, न्याय स्थापित केला, आणि त्यांना देवाची अभिवचने मिळाली, त्यांनी सिंहांची तोडे बंद केली.

Interlinear

Choose Theme