मोशेने लोकांची कुरकुर ऐकली. प्रत्येक कुटुंबातील लोक आपापल्या तंबूसमोर बसून कुरकुर करीत होते. त्यामुळे परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि त्यामुळे मोळे खिन्न झाला.
Cross references
मग इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल परत तक्रार करु लागले. ती परमेश्वराने ऐकली व ती ऐकल्यावर त्याचा राग भडकला. परमेश्वरापासूनचा अग्नि त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या कडेचा काही भाग जाळून टाकिला.
(मोशे फार नम्र माणूस होता. त्याने कधी अभिमान धरला नाही किंवा बढाई मारली नाही पृथ्वीवरील कोणत्याही माणसापेक्षा मोशे अधिक नम्र होता.)
परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि तो त्यांना सोडून निघून गेला.
त्या रात्री छावणीतले सगळे लोक जोरजोरात आक्रोश करायला लागले.
म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या बायका, मुले आणि तहान्या मुलांबरोबर उभे राहिले.
मोशे आणि अहरोन यांनी लोकांना त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, “तुम्ही लोक नेहमी तक्रारी करीत असता. आता माझे ऐका. मी आता या खडकातून पाणी काढीन.”
त्यांनी मोशेविरुद्ध व देवविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “तू आम्हाला ह्या वाळवंटात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”
माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.
त्या लोकांनी म्हटलेले परमेश्वराने ऐकले. देव याकोबावर फार रागावला देव इस्राएलवर फार रागावला.
देवाने हे ऐकले आणि तो खूप रागावला, देवाने इस्राएलला पूर्णपणे झिडकारले.
आमच्या पूर्वजांनी देवाचे ऐकायला नकार दिला.
मरीबा येथे लोक खूप रागावले आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.
परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो. जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.
म्हणून परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. तो आपला हात त्यांच्यावर उगारेल आणि त्यांना शिक्षा करील. मग डोंगरसुध्दा भीतीने कापतील. मृतदेह कचऱ्याप्रमाणे रस्त्यावर पडतील. पण तरीही देवाचा राग शांत होणार नाही. त्याचा हात लोकांना शिक्षा करण्याकरीता उगारलेलाच राहील.
मी तुम्हाला दिलेली भूमी तुम्ही गमवाल. मी तुमच्या शत्रूंना तुम्हाला गुलाम म्हणून अज्ञान भूमीत नेऊ देईन. का? कारण मी खूप संतापलो आहे. माझा संताप प्रखर अग्नीप्रमाणे आहे, त्यात तुम्ही कायमचे जळून भस्म व्हाल.”
येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठीणतमुळे तोे फार खिन्न झाला. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर,” त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला.
येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावाला आणि त्यांना म्हणाला, लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे.