परंतु होबाबाने उत्तर दिले, “नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मला माझ्या देशात व माझ्या लोकात परत गेले पाहिजे.”
Cross references
परमेश्वर अब्रामाला म्हणाला,“तू आपला देश, आपले गणगोत व आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा.
तुला तुझ्या बापाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास परंतु तू माझ्या घरातील कुलदेवाता का चोरल्यास?”
मग थोड्याच दिवसांनी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.
नामी तिला म्हणाली,” तुझी जाऊ बघ कशी आपल्या लोकांत,आपल्या देवाकडे गेली, तूही तसेच केले पाहिजेस,.
मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही, परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.
“जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वत:च्या जिवाचासुद्धा द्धेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
म्हणून आतापासून जगिक दृष्टीकोनातून आम्ही कोणाला मानत नाही, तरी एकेकाळी आम्ही ख्रिस्ताला अशाप्रकारे मानले. पण आता आम्ही तसे करीत नाही.
जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला.
हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत.