Home Bibles गणना 10:11 · मराठी बायबल
गणना 10:11 · मराठी बायबल

इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराचा कोश असलेल्या पवित्र निवास मंडपावरील ढग वर गेला.

Cross references

निर्गम 40:2

“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा पवित्र मंडप उभा कर.

निर्गम 40:17

योग्य वेळी म्हणजे दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवास मंडपाची उभारणी झाली.

गणना 1:1

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; तो म्हणाला,

गणना 9:1

मिसरमधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. परमेश्वर म्हणाला,

गणना 9:5

तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या वाळवंटात संधीप्रकाशात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी हा सण पाळला; परमेश्वराने मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

गणना 9:11

त्याला वल्हांडण सण पाळता येईल; त्याने तो दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी संधी प्रकाशात साजरा करावा. त्यावेळी त्याने अर्पण केलेले कोंकरु, बेखमीर भाकर व कडू भाजीपाला हे खावे;

गणना 9:17

जेव्हा तो ढग पवित्र निवास मंडपावरील जागेवरुन हलत असे तेव्हा इस्राएल लोकही तळ हलवून त्याच्याप्रमाणे जात असत आणि जेव्हा तो थांबत असे तेव्हा त्याच ठिकाणी ते आपला तळ ठोकीत असत. अशा प्रकारे ते तळ ठोकीत असत.

Interlinear

Choose Theme