Home Bibles नहेम्या 8:12 · मराठी बायबल
नहेम्या 8:12 · मराठी बायबल

मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची जी वचने शिक्षक त्यांना समजावून सांगत होते ती त्यांना अखेर समजली.

Cross references

1 इतिहास 29:22

मग परमेश्वासमोर सर्व लोकांनी खाद्यपेयांचा मनमुराद आस्वाद लुटला.दावीदाचा मुलगा शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला.राजपदासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकला अभिषेक केला गेला. हे सर्व परमेश्वरासमोर झाले.

नहेम्या 8:7

बाजूला उभे असलेले लेवी घराण्यातील लोक समुदायाला नियमशास्त्र समजावून सांगत होते. त्या लेवींची नावे अशी: येशूवा, बानी, शेरेब्या, यामीन, अक्कूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद, हानान व पेलाया,

ईयोब 23:12

मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.

स्तोत्रसंहिता 19:8

परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्राच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.

स्तोत्रसंहिता 119:14

तुझ्या कराराचा अभ्यास करणे मला इतर कशाही पेक्षा आवडते.

स्तोत्रसंहिता 119:16

मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही.

स्तोत्रसंहिता 119:72

परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.

स्तोत्रसंहिता 119:97

परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते. मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.

स्तोत्रसंहिता 119:103

माझ्या तोंडात तुझे शब्द मधापेक्षाही गोड आहेत.

स्तोत्रसंहिता 119:111

परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो.

स्तोत्रसंहिता 119:127

परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला तुझ्या आज्ञा आवडतात.

स्तोत्रसंहिता 119:130

जेव्हा लोक तुझा शब्द समजून घ्याला सुरुवात करतात तेव्हा ते त्यांना योग्य तऱ्हेने जीवन कसे जगायचे ते सांगणाऱ्या प्रकाशासारखे असते. तुझे शब्द अगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात.

स्तोत्रसंहिता 119:171

तू मला तुझे नियम शिकवलेस म्हणून मी एकदम गुणगान गायला सुरुवात केली.

स्तोत्रसंहिता 119:174

परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास असे मला वाटते. पण तुझी शिकवण मला आनंद देते.

स्तोत्रसंहिता 126:1

परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.

नीतिसूत्रे 2:10

ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.

नीतिसूत्रे 24:13

मुला, मध खा, तो चांगला असतो. मधाच्या पोळ्यामधला मध गोड असतो.

यिर्मया 15:16

मला तुझा संदेश मिळाला व मी तो खाल्ला (आत्मसात केला.) तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला. तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो कारण तुझे नावच ‘सर्वशक्तिमान परमेश्वर’ असे आहे.

लूक 24:32

मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंत:करणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”

रोमकरांस 7:18

होय, मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही.

Interlinear

Choose Theme