Home Bibles स्तोत्रसंहिता 119:103 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:103 · मराठी बायबल

माझ्या तोंडात तुझे शब्द मधापेक्षाही गोड आहेत.

Cross references

ईयोब 23:12

मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.

स्तोत्रसंहिता 19:10

परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे. ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.

स्तोत्रसंहिता 19:11

परमेश्वराच्या शिकवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला. चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.

स्तोत्रसंहिता 63:5

चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.

नीतिसूत्रे 2:10

ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.

नीतिसूत्रे 3:17

ज्ञान असलेले लोक शांतीत आणि समाधानात जगतात.

नीतिसूत्रे 8:11

ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे. ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.”

नीतिसूत्रे 24:13

मुला, मध खा, तो चांगला असतो. मधाच्या पोळ्यामधला मध गोड असतो.

गीतरत्न 1:2

चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.

गीतरत्न 5:1

माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली. मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले. मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो.प्रिय मित्रांनो, खा, प्या. प्रेमाने धुंद व्हा.

यहेज्केल 3:3

नंतर देव म्हणाला, “मानवपुत्रा, मी तुला हा पट देत आहे. तो गीळ. त्याने तुझे पोट भरु दे.”मग मी तो पट सेवन केला. तो मला मधासारखा गोड लागला.

प्रकटीकरण 10:10

मी ती लहान गुंडाळी देवदूताच्याहातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझेपोट कडवट झाले.

Interlinear

Choose Theme