आणि याजकांच्या घराण्यातील वंशज असे:हबाया, हक्कोस, बर्जिल्लय (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्लयच्या वंशजात होई)
Cross references
दावीद महनाइम येथे आला. शोबी, माखीर आणि बिर्जिल्ल्य तेथेच होते. (नाहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन्यांच्या राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लो-दबार तर बर्जिल्ल्य गिलादमधील रोगलीमचा होता)
गिलादचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला.
“गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.
उरीयाचा मुलगा मेरेमोथ याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडूजी केली. (उरीया हा हक्कोस याचा मुलगा.)बरेख्याचा मुलगा मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. (बरेख्या मशेजबेलचा मुलगा.)बावाचा मुलगा सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली.