Home Bibles मीखा 3:10 · मराठी बायबल
मीखा 3:10 · मराठी बायबल

लोकांना मारुन तुम्ही सियोनची उभारणी केली. तुम्ही लोकांना फसवून यरुशलेम उभे केले.

Cross references

यिर्मया 22:13

राजा यहोयाकीमचे वाईट होईल. तो वाईट गोष्टी करीत आहे. आपला महाल तो बांधू शकेल. लोकांना फसवून त्यावर माड्या चढवू शकेल. तो लोकांना काहीही न देता त्यांच्याकडून काम करवून घेतो, त्यांना कामाची मजुरी देत नाही.

यहेज्केल 22:3

‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे तू तिला सांगितलेच पाहिजेस. नगरी खुन्यानी भरली आहे. म्हणूनच तिच्या शिक्षेची वेळ. लवकरच येईल. तिने स्वत:साठी अंमगळ मूर्ती तयार केल्या, आणि त्या मूर्तींनी तिला गलिच्छ केले.

यहेज्केल 22:25

यरुशलेममधील संदेष्टे कट करीत आहेत. ते संदेष्टे सिंहासारखे आहेत. शिकारीचा समाचार घेताना तो गर्जना करतो. त्या संदेष्टांनी खूप आयुष्यांचा नाश केला, त्यांनी पुष्कळ किंमती वस्तू बळकावल्या आहेत, यरुशलेममधील अनेक स्त्रियांच्या वैधव्याला ते कारणीभूत झाले.

हबक्कूक 2:9

हो! खरेच! चुकीच्या मार्गाने श्रीमंत होणाऱ्या माणसाचे भले होणार नाही. हा माणूस सुरक्षित जागी राहायला मिळावे, म्हणून अशा गोष्टी करतो. त्याच्या उंच इमारतीमुळे तो वाचू शकेल असे त्याला वाटते. पण त्याचे वाईट होईल.

सफन्या 3:3

यरुशलेममधील नेते गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. तिचे न्यायाधीश संध्याकाळी मेंढ्यांवर हल्ला करुन, सकाळी आपल्या भक्ष्याची काहीही नामोनिशाणी न ठेवणाऱ्या भुकेल्या लांडग्याप्रमाणे आहेत.

मत्तय 27:25

सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही व आमची मुले भोगायला तयार आहोत.”

योहान 11:50

तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”

Interlinear

Choose Theme