मत्तय 6:27 · मराठी बायबल
आणि चिंता करुन आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का?
Cross references
स्तोत्रसंहिता 39:5
परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस. माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही. प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते. कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.
उपदेशक 3:14
देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे मी समजतो. देवाच्या कामात लेक आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत. लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे.
मत्तय 5:36
आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण त्याचा एखादा केसही पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही.
लूक 12:25
चिंता करुन तुम्हांपैकी कोण स्वत:च्या आयुष्यात एका तासाची भर घालू शकेल?
1 करिंथकरांस 12:18
परंतु प्रत्यक्षात शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे ठेवला आहे.