Home Bibles मत्तय 6:26 · मराठी बायबल
मत्तय 6:26 · मराठी बायबल

आकाशातील पाखरांकडे पाहा. ती पेरीत नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात, हे तुम्हांला माहीत आहे.

Cross references

उत्पत्ति 1:29

देव म्हणाला, “धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न होतील.

उत्पत्ति 6:21

तसेच तुला व त्यांना लागणारे पृथ्वीवरील सर्व प्रकारचे अन्न तारवात साठवून ठेव.”

ईयोब 35:11

‘देवाने आम्हाला पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’

ईयोब 38:41

ईयोब, डोंब कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवितो?

स्तोत्रसंहिता 104:11

झरे सगळ्या रानटी श्वापदांना पाणी देतात. रानगाढवे देखील तिथे पाणी पिण्यासाठी येतात.

स्तोत्रसंहिता 104:27

देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत. तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.

स्तोत्रसंहिता 145:15

परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.

स्तोत्रसंहिता 147:9

देव प्राण्यांना अन्न देतो, देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.

मत्तय 6:32

सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही, ते सुध्दा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात, काळजी करू नका. कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हांला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे.

मत्तय 7:9

“तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला दगड देईल?

मत्तय 10:29

दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.

लूक 12:6

“पाच चिमण्या दोन पैशांना विकतात की नाही? आणि त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही.

लूक 12:24

कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात!

Interlinear

Choose Theme