मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले. मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले.
Cross references
तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील
तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले तर परमेश्वराचा आत्मा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. मी लहानपणापासून देवाविषयी आदर बाळगून आहे.
मग त्याला ते म्हणाले, “हे बघ, आमच्याकडे पन्नास एक चांगली माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन पुन्हा कोठेतरी डोंगर-दऱ्यांमध्ये टाकले असेल.”पण अलीशा म्हणाला, “नाही, आता एलीयाचा शोध घ्यायला माणसे पाठवू नका.”
मग वाऱ्याने मला उचलले. नंतर मला माझ्यामागून आवाज आला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे प्रचंड होता. त्यांतून “परमेश्वराच्या वैभवाचा धन्यावाद असो” असे शब्द आले.
वाऱ्याने मला उचलून दूर नेले. मी ती जागा सोडली. माझा आत्माफार खिन्न आणि दु:खी झाला होता. पण देवाची शक्ती मोठ्या प्रमाणात मला प्राप्त झाली होती.
मग वाऱ्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्व-द्वाराजवळ नेले. ह्या दाराचे तोंड उगवतीला होते. त्या प्रवेशद्वाराच्या तोंडाशी मी पंचवीस लोकांना पाहिले. त्यांत अज्जूरचा मुलगा याजन्या आणि बनायाचा मुलगा पलट्या हेही होते. हे लोकांचे नेते होते.
मग वाऱ्याने मला उचलून परत बाबेलला खास्द्यांच्या देशात आणले. इस्राएलच्या ज्या लोकांना बळजबीने इस्राएल सोडावे लागले होते, त्यांच्यात त्याने मला आणले, मग, दुष्टान्तामध्येच, देवाच्या चैतन्याने मला सोडले व ते हवेत उंच गेले. मी हे सर्व दृष्टान्तात पाहिले.
दुष्टान्तात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्या पर्वतावर गावासारखे दिसणारे बांधकाम होते. ते दक्षिणेकडे होते.
मग वाऱ्यानेमला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. मंदिर परमेश्वराच्या प्रभेने भरुन गेले.
नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले.
येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले.
मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही.
जेव्हा ते पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला.
कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाची मुले आहेत.
कारण ज्याअर्थी त्याला स्वत:ला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
कारण आपल्याला लाभलेला माहन याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला.