तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
Cross references
योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
आपल्या बापाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे पाहिले तेव्हा योसेफाला ते आवडले नाही; त्याला तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरुन काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावयास पाहिजे होता म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात धरला.
राजांच्या मुली करवल्या आहेत. तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुध्द सोन्याचा मुगुट धारण करुन उभी आहे.
आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत. आम्ही सदैव तुझी स्तुती करु. देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.
तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ.
परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत.
परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन. माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”
मग प्रभु येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत.
मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीति करतोस काय?”तो म्हणाला, “होय प्रभु, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.”
दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वत: म्हणाला,‘प्रभु (देव) माझ्या प्रभुला म्हणाला: मी तुझे वैरी
जो तो ख्रिस्तामध्ये करतो. जेव्हा त्याला (ख्रिस्ताला) मरणातून उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला.